कोलकाता – येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया साइट X वर पोस्ट शेअर केली आहे.
कोलकाता में जूनियर डॉक्टर के साथ हुई रेप और मर्डर की वीभत्स घटना से पूरा देश स्तब्ध है। उसके साथ हुए क्रूर और अमानवीय कृत्य की परत दर परत जिस तरह खुल कर सामने आ रही है, उससे डॉक्टर्स कम्युनिटी और महिलाओं के बीच असुरक्षा का माहौल है।
पीड़िता को न्याय दिलाने की जगह आरोपियों को…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 14, 2024
पोस्ट शेअर करताना राहुल गांधींनी लिहिले की, “कोलकाता येथे एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ज्याप्रकारे तिच्यावर होणाऱ्या क्रूर आणि अमानवी कृत्यांचा थरार समोर येत आहे, त्यामुळे डॉक्टर समाज आणि महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण करतो.
या घटनेने विचार करायला भाग पाडले आहे की, वैद्यकीय महाविद्यालयासारख्या ठिकाणी जर डॉक्टरच सुरक्षित नसतील, तर पालकांनी आपल्या मुलींना शिकण्यासाठी बाहेर कशाच्या आधारावर विश्वास ठेवायचा? निर्भया प्रकरणानंतर बनवलेले कडक कायदेही असे गुन्हे रोखण्यात अयशस्वी का आहेत?
हाथरसपासून उन्नावपर्यंत आणि कठुआपासून कोलकातापर्यंत प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक घटकाला एकत्र येऊन गंभीर चर्चा करावी लागेल आणि महिलांवरील वाढत्या घटनांवर ठोस उपाययोजना कराव्या लागतील. या असह्य दु:खात मी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. त्यांना प्रत्येक परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली –
ललनटॉपला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता की, त्यांना त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. आपल्या मुलीचा मृतदेह पाहण्यासाठी त्यांना तीन तास हॉस्पिटलबाहेर थांबावे लागले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा हॉस्पिटलमधून फोन आला तेव्हा हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे आणि तुम्ही त्वरित यावे.” या प्रकरणाला देशभरातील डॉक्टरांचा विरोध आहे. त्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.