नवी दिल्ली – देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना हा मोठा धक्का बसल्याच सांगण्यात येत आहे.
सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. त्यामुळे हा संसदीय समितीने हा निर्णय घेतला आहे.
नेमकं प्रकरण काय? वाचा….
13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी या सभेत,” नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात ? असा सवाल जाहीर सभेत केला होता.
राहुल यांच्या या वक्तव्याबाबत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. भाजप आमदाराने आरोप केला होता की, 2019 मध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना, सर्व चोरांना मोदी हे आडनाव का आहे, असे म्हणत राहुल यांनी संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी केली असल्याचा आरोप पूर्णेश मोदी यांनी केला होता. याच प्रकरणात आता राहुल गांधींना कोर्टाने दोषी ठरवले असून, आता त्यांची खासदारकी सुद्धा रद्द करण्यात आली आहे.