राहुल गांधी मोदी सरकारला खोचक सवाल, ‘देश  कधी पर्यंत वाट पाहणार?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात या त्यांच्या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आपल्या देशातले शेतकरी हे ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पेनचा कणा आहेत असे वक्तव्य केले आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदी सरकारवर यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विचारलेल्या प्रश्नावरून एख ट्वटि केलं आहे.

ज्यामध्ये राहुल गांधी म्हणतात, “ प्रश्न तर योग्य आहे, मात्र सरकारच्या उत्तराची देश  कधी पर्यंत वाट पाहणार? जर, कोविड अॅक्सेस स्ट्रॅटेजीच मन की बात असती. ” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. सोबतच अदर पूनावाला यांनी आरोग्य मंत्रालयास केलेल्या प्रश्नाबाबतचे वृत्त देखील संदर्भासाठी जोडले आहे.

तत्पूर्वी,  भारत सरकारकडे पुढील वर्षभरात 80 हजार कोटी रुपये उपलब्ध होतील का? त्यामुळे देशातील प्रत्येकाला लस खरेदी आणि वितरित करता येईल. या आपल्यापुढील चिंता करायला लावणाऱ्या आव्हानाला तोंड द्यायचे आहे, असे  ट्विट करत करोनावरील लस सर्व भारतीयांना देण्यासाठी पुढील वर्षभरात केंद्र सरकारला 80 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. याची जाणीव सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी करून दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.