छत्तीसगड – काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी मोहन मार्कम यांची वर्णी

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने छत्तीसगड राज्यात प्रदेश अध्यक्षपदी मोहन मार्कम यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे छत्तीसगड राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते.

दरम्यान, छत्तीसगड राज्यात भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.