कॉंग्रेसला पक्षाध्यक्षपदी हवेत राहुल गांधीच

नवी दिल्ली -कॉंग्रेसमध्ये नेतृत्वबदल होणारी की नाही याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली असली तरी पक्षाला अध्यक्षपदी राहुल गांधीच हवे असल्याचे शनिवारी पुन्हा स्पष्ट झाले. राहुल यांनी पदावर कायम रहावे, असा एकच सूर पक्षात असल्याचे कॉंग्रेसने म्हटले.

कॉंग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथे पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांची पत्रकार परिषद झाली. राहुल यांनी पदावर कायम रहावे अशी संपूर्ण पक्ष संघटनेतील भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. कॉंग्रेस कार्यकारिणीने याआधीच राहुल यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळला. पक्षाचे नेतृत्व राहुल यांनी स्वत:कडेच ठेवावे, अशी विनंती करणारा ठरावही कार्यकारिणीने मंजूर केल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

कॉंग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी अजूनही पदांचा राजीनामा का दिला नाही, या पत्रकारांच्या प्रश्‍नावर थेट उत्तर देण्याचे खेरा यांनी टाळले. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदी कायम रहावे अशी विनंती करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे, अशा शब्दांत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.