Rahul Gandhi । देशात लोकसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यात कुठे ना कुठे मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशीच एक बातमी समोर येत आहे. एका तरुणाने चक्क आठवेळा मतदान केल्याची घटना उघडकीस आलीय. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावरून राजकीय प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनीही या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिलीय.
राहुल गांधी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव यांनी एक तरुण आठ वेळा मतदान करत असल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तसेच निवडणूक आयोगाला असे वाटत असेल की हे चुकीचं आहे, तर त्यांनी कारवाई करावी, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. याबरोबरच ही भाजपाची बूथ कमेटी नसून लूट कमेटी आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. यादव यांच्या या पोस्टला रिपोस्ट करत राहुल गांधी यांनी निवडणूक अधिकारी आणि सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलं.
आमचे सरकार आल्यावर त्यांच्यावर कारवाई Rahul Gandhi ।
आपला पराभव समोर दिसू लागल्याने भाजपाला सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही धोक्यात आणायची आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून घटनात्मक जबाबदारी विसरू नये, अन्यथा, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात येईल, की भविष्यात कोणीही ‘संविधानाच्या शपथेचा’ अवमान करण्यापूर्वी १० वेळा विचार करेल, असा इशाराही त्यांनी दिली.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी दोन मिनिटांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओ एक तरुण भाजपाचे उमेदवार मुकेश राजपुत यांना चक्क आठ वेळा मतदान करताना दिसत होता. या व्हिडीओची पुष्टी होऊ शकली नसली तरी हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितलं जात आहे.
पोलिसांकडून तरुणाला अटक Rahul Gandhi ।
दरम्यान इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून या तरुणाला अटक करण्यात आली आहे. राजन सिंग असं या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा
पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ; पंतप्रधान म्हणाले,”मतदानात उत्साहाने सहभागी व्हा”