World Wrestling Championship : ‘राहुल आवारेची’ कांस्यपदकाला गवसणी

कझाकस्तान – भारताचा मराठमोळा पहिलवान राहुल आवाराने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणारा आणि पदक मिळवणारा तो पहिलाच कुस्तीपटू ठरला आहे. राहुलने ६१ किलो वजनी गटात अमेरिकेचा प्रतिस्पर्धी टेलर ली ग्राफवर ११-४ ने मात करत कांस्यपदकावर नाव कोरल. यंदाच्या स्पर्धेतल भारताचे हे पाचवे पदक ठरले आहे. याआधी २०१३ साली भारतीय मल्लांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ३ पदके पटककावली होती.

दरम्यान, कांस्यपदकाच्या सामन्यात राहुलने संपूर्णपणे वर्चस्व राखले होते. आतापर्यंत राहुलने आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 2 कांस्य आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतलं कांस्यपदक ही राहुलची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. राहुलच्या या कामगिरीमुळे त्याचावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)