सांगली : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यादरम्यान आता रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेनेदेखील विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक फार अटीतटीची होणार आहे.
पहिली यादी जाहीर
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेची पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ७ विधानसभा मतदारसंघ लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अकोट, पाथरी, इंदापूर, कराड उत्तर, करवीर, हातकणंगले, पलूस कडेगाव याठिकाणी शेतकरी संघटनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
कोणाकोणाला दिली उमेदवारी ?
28- अकोट -लक्ष्मीकांत गजानन कोठेकर.
18- पाथरी – मोहन जर्नादनराव मानोहीकर.
10- इंदापूर – पांडुरंग संभाजी रायते.
258- कराड उत्तर – वसीम मकबूल इनामदार.
275- करवीर – माणिक बाबूराव शिंदे.
208 – हातकणंगले – डॉ. प्रगती रविंदर चव्हाण
185- पलूस कडेगाव – परशुराम तुकाराम माळी