नवी दिल्ली – राफेल प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १० मे पर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच राफेल प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या कोर्टाच्या अवमानाबद्दलची सुनावणीही पुढे गेली आहे. या दोन्ही खटल्यांमध्ये 10 मे ला सुनावणी होईल,असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितल आहे.
Rafale review petition hearing adjourned till May 10, when the Supreme Court will hear contempt petition against Rahul Gandhi as well. pic.twitter.com/RHPtp2Fr95
— ANI (@ANI) May 6, 2019
दरम्यान, राफेल प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी फेरविचार याचिका दाखल केली आहे. राफेल विमानांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तर राफेल प्रकरणी सुनावणीच्या वेळी चौकिदार चोर है असं कोर्टाने म्हटलं, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यावर भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली होती.