राफेलला भारतात येण्यास लागणार ८ महिने, उड्डाणासाठी लागणार तब्बल १९ महिने

नवी दिल्ली – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी राफेल विमानाच पूजन केल. राफेल विमानामुळे भारताची हवाई ताकद निश्चितच वाढणार आहे. मात्र, भारतीय वायुसेनेमध्ये दाखल होण्यास राफेलला 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

पहिल राफेल लढाऊ विमान फ्रान्सने भारताला मंगळवारी सुपूर्द केलं. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विमानाची पूजा केली. अधिकृतरित्या हे विमान भारताच्या ताफ्यात देण्यात आले. यावेळी विमानावर ओम काढून आणि नारळ ठेवून राजनाथ सिंह यांनी पूजा केली. राफेलच्या चाकाखाली दोन लिंबही ठेवण्यात आली होती. राफेलची निर्मिती दसॉल्ट या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. तसच यावर मिटिऑर आणि स्काल्प क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे.

भारतीय वायुसेनेमध्ये कधी दाखल होणार –
फ्रान्स आणि भारतात झालेल्या कारारानुसार एकूण 36 विमाने भारताला मिळणार आहे. त्यापैकी मे 2020 पर्यंत 4 राफेलची विमाने भारताकडे सूपूर्त करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये आता भारतीय वायूसेनेतील अधिकाऱ्यांना हे विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे यासाठी काही कालावधी लागणार आहे, त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये भारतात या विमानाचे उड्डाण करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.