नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल हे विमान दाखल झाले आहे. फ्रान्सकडून हे विमान भारताला सुपूर्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय वायुदलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. फ्रान्समधील दसॉ ऍव्हिएशन या कंपनीने पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाला सोपवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Indian Air Force (IAF) Sources: IAF received its first ‘acceptance’ Rafale combat aircraft from Dassault Aviation in France, yesterday. Deputy Air Force Chief Air Marshal VR Chaudhary also flew in the aircraft for around one hour. (file pic) pic.twitter.com/bzm0gwuVWd
— ANI (@ANI) September 20, 2019
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राफेल करारावरुन मोदी सरकारवर राहुल गांधी यांनी वारंवार निशाणा साधला होता. तसेच राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबांनींचा फायदा व्हावा म्हणून मध्यस्थाचे काम केले असाही आरोप केला होता. इतकंच नाही तर राफेल विमानाची किंमत आघाडीच्या काळापेक्षा वाढवण्यात आली असेही कॉंग्रेसने म्हटले होते. आज अखेर फ्रान्सने पहिल्या विमानाची डिलिव्हरी भारताला दिली आहे. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात पहिले राफेल दाखल झाले आहे. डेप्युटी एअर फोर्स चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी तासभर या विमानातून उड्डाण केले असल्याचे सांगण्यात येत आहे.