पॅरिस – लाल मातीवरील कोर्टचा बादशहा व स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याने अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सर्बियाचा आग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याचा 6-0, 6-2, 7-5 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद साकार केले.
स्पर्धेत अग्रमानांकित व द्वितीय मानांकित खेळाडू समोरासमोर आल्याने सामना अत्यंत रंगतदार होण्याची अपेक्षा होती. मात्र, तिसरा सेट वगळता जोकोवीचला नदालला आव्हानच देता आले नाही.
महिला दुहेरीत बाबोस-म्लादेनोवीक विजेते
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत हंगेरीची टिमा बाबोस व फ्रान्सची क्रिस्टिना म्लादेनोवीक या जोडीने विजेतेपद पटकावले. त्यांनी चीलीच्या अलेक्सा गौराची व अमेरिकेच्या डीझायर क्रॉवेचेक जोडीवर 6-4, 7-5 अशी मात केली.
बाबोस व म्लादेनोवीक जोडीने मिळवलेले फ्रेंच स्पर्धेचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे. याच जोडीने 2018 साली तसेच यंदा देखील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतही विजेतेपद पटकावले होते.