#AusOpen : थिमकडून नदालला पराभवाचा धक्का

मेलबर्न : आॅस्ट्रियाच्या नवोदित डाॅमिनिक थिमने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकालाची नोंद करताना स्पेनच्या अव्वल मानांकित राफेल नदालला पराभूत केले.

जवळपास ४ तास, १० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात थिमने नदालचा ७-६, ७-६, ४-६, ७-६ असा पराभव करत स्पर्धेतील सर्वात आश्चर्यकारक निकाल नोंदविला. या विजयासह त्याने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

उपांत्य फेरीत डाॅमिनिक थिमची लढत आता जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी होईल. झ्वेरेवने स्टॅन वाॅवरिन्कावर १-६, ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.