मेलबर्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या स्पेनच्या रफाएल नदालने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. रफाएल नदाल ४१ वेळेस ग्रँडस्लम स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश मिळविण्यात यशस्वी ठरला आहे.
NEXT-LEVEL NADAL! 👏@RafaelNadal defeats Nick Kyrgios in four sets to reach his 41st Grand Slam quarter-final. #AusOpen pic.twitter.com/7SJzeTzPbh
— ATP Tour (@atptour) January 27, 2020
आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत नदालचा सामना आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसशी झाला. दोघांमध्ये संघर्षपूर्ण लढत झाली. तीन तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या सामन्यात दोघांत कडवी झुंज पहायला मिळाली. मात्र, यामध्ये अनुभवी नदालने जबरदस्त कामगिरी करत निक किर्गिओसचा ६-३, ३-६, ७-६(६),७-६(४) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आता उपांत्यपूर्व फेरीत नदालसमोर डाॅमिनिक थिमचे आव्हान असणार आहे.
Rafa has done it!
The World No. 1 finishes off an amazing win over Aussie hopeful Nick Kyrgios in four tight sets. #AusOpen pic.twitter.com/o9CyCmJz1Z
— US Open Tennis (@usopen) January 27, 2020
डाॅमिनिक थिमने पुरूष एकेरीत चौथ्या फेरीत फ्रान्सच्या दहाव्या मानांकित गेल मोनफिल्स याचा ६-२, ६-४, ६-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
It's a first #AusOpen quarterfinal for Dominic Thiem ➡ pic.twitter.com/p38Ti2QyW5
— US Open Tennis (@usopen) January 27, 2020
दरम्यान, राफएल नदालने तिस-या फेरीत पाब्लो कॅरेनो बुस्ताला याचा ६-१, ६-२, ६-४ असा पराभव करत आगेकूच केली होती. दुसरीकडे निक किर्गिओसने तिस-या फेरीत रशियाच्या कॅरेन खाचानोवचा ६-२,७-६(५), ६-७(८), ६-७(७), ७-६(८) असा पराभव करत चौथ्या फेरीत धडक मारली होती.