आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राधिका इंगळे राज्यात प्रथम

खटाव तालुक्‍यातील 14 विद्यार्थी राज्य गुणवत्तायादीत

बुध – पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आठवीमध्ये खटाव तालुक्‍यातील 14 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये चमकले असून हुतात्मा परशुराम विद्यालयाची राधिका संजय इंगळे हिने राज्यात प्रथम व आदित्य बोराटे राज्यात तिसरा क्रमांक पटकवला. इयत्ता 8 वी चे 95 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. तर पाचवीमध्ये 82 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. राज्य यादीमध्ये सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. नुरेन इनामदार याने राज्यात पाचवा क्रमांक पटकविला. खटाव तालुक्‍यातील 177 विद्याथी शिष्यवृत्तीधारक झाले असून खटाव तालुका शिक्षण विभागाचा शिष्यवृत्ती पॅटर्न यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विशेष प्रयत्त केले.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विदयार्थी पुढीलप्रमाणे- नुरेन इनामदार( राज्यात पाचवा), अथर्व जाधव, चिन्मय कोळी, सई सुर्वे (राज्यात दहावा), सायली माने, आदित्य मगर. इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी- राधिका इंगळे (राज्यात प्रथम), आदित्य बोराटे ( राज्यात तिसरा), चिन्मय इनामदार (राज्यात पाचवा), मृणाल कचरे, अक्षता गांधी (राज्यात सातवा), अवंतिका घाडगे व प्रज्वल जाधव (राज्यात 11वा), आशिया काझी (राज्यात 13वी), रणजित शिंदे, उज्वला खाडे, श्रद्धा निकम, शुभंकर शिंदे, सिद्धांत चिंचकर (राज्यात 17 वा), ईशा गावड, विदयार्थी राज्याच्या गुणवत्तायादीत चमकले आहेत.

खटाव तालुक्‍यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा सुरू झाल्यापासून 2016-17 मध्ये 143 विद्यार्थी, 2017- 18 मध्ये 160 विदयार्थी तर या वर्षी 177 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. खटाव तालुक्‍यामध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याचा चढता आलेख दिसून येत आहे. या यशाबद्दल सभापती कल्पनाताई मोरे, उपसभापती संतोष साळुखे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, गटविकास अधिकारी रमेश काळे, गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी अभिनंदन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)