मुंबई – मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळम अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ‘राधिका आपटे’चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सिनेसृष्टीत राधिका आपटेची एक दिग्ज कलाकार म्हणून ओळख आहे.
राधिका आपटेचा जन्म 7 सप्टेंबर 1985 साली तामिळनाडूमधील वेल्लोर येथे झाला होता. आणि त्यानंतर राधिकाचे सर्व कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. सोशल मीडियावर राधिका प्रत्येक मुद्यावर आपलं मत व्यक्त करत असते. बेनेडिक्ट टेलर या संगीतकार सोबत 2012 साली राधिका विवाह बंधनात अडकली.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये राधिका म्हणाली कि, “लग्न केल्यामुळे व्हिसा मिळणं सोपं होतं, हे समजल्यामुळे मी लग्न केलं. कारण आम्हा दोघांना एकत्र राहायचं होतं आणि मला व्हिसा मिळत नव्हता. माझा लग्नसंस्थेवर फारसा विश्वास नाही. पण लग्न केल्यामुळे मला व्हिसा सहज मिळाला”.
View this post on Instagram
Say hello to Netflix’s new Massey-iah. #VikFlix @netflix_in @radhikaofficial
अभिनेता विक्रांत मेस्सीने राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत विक्रांत व राधिकाने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.