मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे ही सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. राधिका दुसऱ्या महायुद्धातील महिला हेरांच्या कथेवर आधारित “ए कॉल टू स्पाय’मध्ये झळकणार आहे. यात ती ब्रिटिश गुप्तहेर नूर इनायत खानची भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
या भूमिकेविषयी राधिका म्हणाली, “एखाद्या वास्तविक व्यक्तीची भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक असते. मी साकारत असलेल्या भूमिकेविषयी माझ्याकडे कोणतीही व्हिडिओ क्लिप नाही, जे मी पाहू शकेन. यासाठी फक्त पुस्तके आणि छायाचित्र यांच्या आधारे हे पात्र मला साकारायचे आहे, असे राधिकाने सांगितले.
View this post on Instagram
लिडा डीन पिल्चर यांनी दिग्दर्शन केले आहे. सारा मेगन थॉमस यांनी पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज करण्यात आला आहे. राधिकाने 2005मध्ये “वाह! लाइफ हो तो ऐसी’ चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारत बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते.
View this post on Instagram
यानंतर “शोर इन द सिटी’, “कबाली’, “फोबिया’, “बदलापुर’ आणि “अहल्या’ आदीमध्ये दमदार भूमिका साकारली आहे. तसेच “लस्ट स्टोरीज’, “सेक्रेड गेम्स’ आणि “पॅड मॅन’मधील तिच्या भूमिकेला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.
View this post on Instagram