राधिका आपटे बनणार गुप्तहेर

राधिका आपटेने हॉलिवूडच्या एका सिनेमामध्ये दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर महिलेचा रोल केला आहे. “लिबर्टे : अ कॉल टू स्पाय’ असे या सिनेमाचे नाव आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हेरगिरी करणाऱ्या एका हिरोईनवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. या सिनेमाचा प्रिमिअर नुकताच लंडनमध्ये झाला. त्यासाठी राधिका ब्रिटनला गेली होती. एडिनबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा प्रिमिअर झाला.

राधिका आपटेने या सिनेमातील आपल्या सहकलाकारांबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एकच दिवस आगोदर तिने या सिनेमातील आपला फर्स्ट लुक देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ती ज्या गुप्तहेर हिरोईनचा रोल करते आहे, त्या नूर इनायत खानच्य मूळ फोटो बरोबऱ्‌ तिने आपल फोटो शेअर केल्याने तिच्या चित्रपटाची वास्तव पार्श्‍वभुमी लक्षात येते. नूर इनायत खनला त्या काळी नोरा बाकर म्हणून संबोधले जात असे. महायुद्धाच्या काळात ती ब्रिटीशांची पहिली महिला वायरलेस ऑपरेटर होती. फ्रेंच सैन्याला मदत करण्यासाठी ती पॅरेशूटने नाझींच्या ताब्यातील फ्रान्सच्या भूभागात उतरली होती. नाझी सैन्याविरोधात चर्चिल यांनी “एसओई’ नावाची गुप्तहेर संघटना उभारली होती. नोरा त्याचीच सदस्य होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here