मुंबई – भारतातील टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये राधिका आपटेचा समावेश होतो. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. केवळ हिंदीतच नव्हे, तर राधिका आपटेने बंगाली, तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी आणि इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले आहे.
तिच्या वैविध्यपूर्ण गुणांचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तिने चक्क कथ्थकचा सराव करतानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ तिच्या युवाकाळातील आहे आणि तिच्या मैत्रिणीबरोबर ती कथ्थकचा सराव करत असताना या व्हिडिओत दिसते आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने हा व्हिडिओ आपल्याला पाठवल्याबद्दल आपल्या मैत्रिणीचे आभार मानले आहेत. राधिकाने खूप वर्षांपूर्वी कथ्थक शिकले आहे आणि ती बऱ्याच वर्षांपर्यंत कथ्थकचा सरावही करत होती.