“मिसेस अंडरकव्हर’मध्ये राधिका आपटे बनली गुप्तहेर

मिसेस अंडरकव्हर या आपल्या आगामी सिनेमामध्ये राधिका आपटे चक्क गुप्तहेराच्या रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे टीजर पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये साडी नेसलेली राधिका आपटे साडीमध्येच पिस्तूल खोचून ठेवत असल्याचे दिसते आहे. 

तिचा हा अवतार प्रेक्षकांसाठी अगदीच नवीन असणार आहे. स्वतः राधिकालाही हा भन्नाट रोल खूप आवडला. आपण एकाचवेळी हेरगिरी करणार आणि त्याचवेळी सर्वसामान्य स्त्रीच्या भूमिकेतही वावरणार असल्याने हा रोल खूप अपील झाल्याचे तिने सांगितले.

“मिसेस अंडरकव्हर’ ही निश्‍चितच एक क्राईम थ्रिलर स्टोरी असणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये सस्पेन्स आणि रोमान्सलाही भरपूर वाव असणार असे आता तरी वाटते आहे.

पुढच्यावर्षी मार्च महिन्यात हा सिनेमा रिलीज करण्याचे निर्मात्यांचे नियोजन आहे. त्यामध्ये राधिकाबरोबर सुमित व्यासही असणार आहे आणि नवोदित अनुश्री मेहतावर डायरेक्‍शनची जबाबदारी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.