राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर ?,मोदींच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता

पुणे – काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. अहमदनगर इथं भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विखेंचा भाजपप्रवेश होण्याची शक्यता आहे.

राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिण नगर मतदारसंघातून आघाडीने तिकीट नाकारले होते त्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेत भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली. त्यानंतर आता वडील राधाकृष्ण विखे हेदेखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर 19 मार्च रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपवित विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.