राधाकृष्ण विखे-पाटलांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई – काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे.

राधाकृकष्ण विखे पाटील म्हणाले की, माझी काँग्रेसमध्ये कोंडी होत आहे असुन आता माझी इथे घुसमट होत आहे. मला अनेक आमदार भेटत आहेत परंतु, त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मी मात्र आज एकटा राजीनामा देत आहे.

या अगोदर राधाकृष्ण पाटील यांच्या बंगल्यावर एक बैठक पार पडली, या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढाचे खासदार रणजीत निंबाळकर आदींची उपस्थिती होती. या बैठकीनंतरच राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले.

सुजय यांच्या भारतीय जनता पक्षामधील प्रवेशानंतर त्यांचे वडील तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुजय याच्या भाजप प्रवेशाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडत आपण काँग्रेसमध्ये असलो तरी नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पाठिंबा आपल्या पुत्राला असे असं त्यांनी स्पष्ट केलं होत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.