राधाकृष्ण विखे पाटलांची लवकरच घरवापसी

अहमदनगर: काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याचे मोठे वक्तव्य ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. विखे पटली महाविकास आघाडीत परत येतील. ते काँग्रेस विचारांचे आहेत. विखे पाटील नाईलाजाने तिकडे गेले आहेत, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आपली सत्ता जाईल असं वाटलं नव्हतं. मात्र, त्यांना महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यामुळे अचानक झटका बसला आहे. त्यामुळे ते दिवस-रात्र टीका करत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.