राधाकृष्ण विखे पाटील भाजपात होणार सामील; महाराष्ट्र भाजपचे ट्विट

मुंबई: काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. आता थेट महाराष्ट्र भाजपने हे स्पष्ट केले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्यांनी “श्री राधाकृष्ण विखे पाटील” भाजपात होणार सामील, असे ट्विट केले आहे.

विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ते भाजप किंवा शिवसेनेत दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण निवडणूक झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करू, अशी भूमिका विखे पाटलांनी मांडली होती. मात्र आता भाजपने जाहीर केल्यानंतर विखे पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे बोलल्या जात आहे .

राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिण नगर मतदारसंघातून आघाडीने तिकीट नाकारले होते त्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेत भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली. आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा पराभव करत ते निवडणून देखील आले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here