अहमदनगर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान करण्यासाठी आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांमध्ये कोणते बटन दाबायचे? असा मिश्किल प्रश्न विचारला. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या प्रश्नावर एकच हास्यकल्लोळ झाला.
दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बरेच दिवस जुंपली होती. अखेर सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलीकडेच आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. तर मागील काही दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील हे देखील काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात सामील होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.