BREAKING : राधाकृष्ण विखे-पाटलांचा राजीनामा स्वीकारला – अशोक चव्हाणांची माहिती

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये नगरचे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता.

सुजय यांच्या भारतीय जनता पक्षामधील प्रवेशानंतर त्यांचे वडील तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुजय याच्या भाजप प्रवेशाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडत आपण काँग्रेसमध्ये असलो तरी नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पाठिंबा आपल्या पुत्राला असे असं त्यांनी स्पष्ट केलं होत.

दरम्यान, सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये आले असताना राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज राजकीय वर्तुळामध्ये वर्तवण्यात येत होता मात्र राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्याला या सभेपासून दूर ठेवले होते.

आता याच पार्श्ववभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपण राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याचे सांगितले आहे.   .

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.