-->

हॉलीवूडची राधा राणी

ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अंबर इंडिगो मिशेल हिचे मूळ नाव राधा राणी आहे, हे अनेकांना माहीत नसेल. भारतातील तर सोडाच, पण ऑस्ट्रेलियातील तिच्या चाहत्यांनाही कदाचित याविषयी माहिती नसेल, पण हे खरे आहे. अंबरला स्वतःला भारताविषयी खूप प्रेम आणि ओढ असून तिची आई कृष्णभक्‍त आहे.

राधा राणीचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला असून तिचे आईवडीलही ऑस्ट्रेलियाचेच स्थानिक नागरिक आहेत, पण केवळ कृष्णावरील अपार भक्‍तीपोटी आईने तिचे नाव राधाराणी ठेवले. राधाराणीने आजवर हाय आर्ट, पिच ब्लॅक, फोन बूथ, मॅन ऑन फायर, फाइंडिंग नेवरलॅंड, मेलिंडा अँड मेलिंडा, सायलेंट हिल आणि द क्रेजीज यांसारख्या सुप्रसिद्ध हॉलीवूडपटांमध्ये काम केले आहे.

राधाराणीची खरी ओळख केंट विंसलेट आणि जॉनी डेप यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या “फाइंडिंग नेव्हरलॅंड’ या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर झाली. अँजेलिना जोली, केट विन्सलेट, ज्युलिया रॉबर्टस्‌, कीरा नाइटली, स्कारलेट जॉनसन यांसारख्या हॉलीवूड नायिकांप्रमाणेच राधाराणीचेही भारतात अनेक चाहते आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.