रावळपिंडी – पाकिस्तानमध्ये पदावरून पायउतार झालेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी “चौकीदार चोर है’ अशी घोषणाबाजी केली. इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर होण्याच्या निषेधार्थ पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पार्टीचे नेते शेख रशिद अहमद यांच्या सभेमध्ये ही घोषणाबाजी झाली.
इम्रान खान यांना पायउतार व्हायला लागल्याचा निषेध करण्यासाठी लाल हवेली भागात हजारोंचा जनसमुदाय जमला होता. त्यावेळी इम्रान समर्थकांनी पाकच्या लष्कराला इम्रान यांचा जनाधार चोरल्याबद्दल “चोर’ असे संबोधले. मात्र मंचावरून शेख रशिद अहमद हे लोकांना अशी घोषणाबाजी न करण्यासाठी थाबवण्याचा प्रयत्न करत होते. आपण शांततेने हा लढा लढणार आहोत, असे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते.
लष्कराला जर निर्णय घ्ययचा होता, तर किमान रात्रीच्या अंधारात घेण्यापेक्षा दिवसा उजेडी तरी घ्ययला पाहिजे होता, असे शेख रशिद अहमद म्हणाले. इर्मान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाच्या निषेधार्थ 29 एप्रिलला येणाऱ्या ईदपासून दररोज जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
“चौकीदार चोर है’ ही घोषणा सर्वप्रथम कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात 2019 च्या निवडणूक प्रचारादरम्यान केली होती.