पाटणा : बिहारमध्ये राज्य सरकारचे अधिवेशन सत्र सुरू आहे. मात्र मंगळवारी अधिवेशनात चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. सरकारच्या आदेशानंतर सुरक्षा जवानांनी आमदारांना सभागृहातून बाहेर काढताना राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या झटापटीत अनेक आमदारांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आमदारांना एवढी मारहाण करण्यात आली कि त्यांना शेवटी स्ट्रेचरवर उचलून बाहेर आणावे लागले.
बिहार विधानसभेत मंगळवारी ‘विशेष सशस्त्र पोलीस विधेयक 2021’ संमत करण्यात आले. या विधेयकास विरोध करताना विरोधकांनी गोंधळ केला, तर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी हे बिल फाडून अध्यक्षांसमोरच फेकून दिले. तेजस्वी यादव यांनी अशारितीने आपला विरोध दर्शवल्यानंतर इतर आमदारांनीही या विधेयकाला विरोध असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. तसेच, वेलमध्ये येऊन आपला विरोध दर्शवला. त्यानंतर, मोठा गोंधळ उडाल्यामुळे पोलीस जवान आणि सुरक्षा रक्षकांनी हाताला धरुन बळजबरीने आमदारांना सभागृहाबाहेर काढले.
पूर्व मंत्री हमारी महिला विधायक अनिता देवी जी को निर्लज्ज नीतीश कैसे घसीटवा रहे है। इसी क्रम में साड़ी भी खुल जाती है।
तुमने आज ये जो चिंगारियाँ भड़काई है कल यही चिंगारियाँ तुम्हारे काले काल के काले सुशासन को जला कर भस्म कर देंगी। बिहार हिसाब करेगा और जल्द।#नीतीशकुमार_शर्म_करो pic.twitter.com/3vpANxSMPZ
— Rabri Devi (@RabriDeviRJD) March 23, 2021
आमदारांना सभागृहाबाहेर घेऊन येताना पोलिसांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. विधानसभा सभागृहात आमदारांसमवेत करण्यात आलेल्या व्यवहारामुळे राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार सरकारवर जबरी टीका केली आहे. नितीश कुमार सरकार हे बलात्काऱ्यांपेक्षाही वाईट असल्याचे आरजेडीने म्हटले आहे.