मुंबई – दिग्दर्शक ‘रोहित शेट्टी’चा चित्रपट म्हंटल की डोळ्यासमोर उभी राहते गाड्यांची तोडफोड, हिरो व्हिलनची मारधाड आणि बरच काही. सिंघम, गोलमाल आणि सूर्यवंशी अशा सुपरहिट चित्रपटांची माळ लावल्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित शेट्टी एक नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. स्वतः रोहित शेट्टीने यांदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे सुपरहिट कॉप ड्रामा चित्रपट दिल्यानंतर रोहित शेट्टी आता पुढचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘सिंघम’चा हा तिसरा भाग असणार आहे. यामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा कडक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे ‘सिंघम अगेन’ची कथा ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांशी जोडलेली असेल अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे तिन्ही सुपरस्टार्स एकाच चित्रपटात आपापल्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. मात्र, ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.