नवी दिल्ली: बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि भाजपचे खासदार परेश रावल यांच्यात जोरदार ट्विटर युद्ध रंगले आहे. राबडी देवींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याला परेश रावल यांनी उत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा या ट्विटर युद्धाने वेग घेतला आहे.
राबडी देवी मोदींवर टीका करताना म्हणाल्या, पंतप्रधान काल मुजफ्फरपूर या लिचीच्या शहरात आले असताना तेथील लोकांनी त्यांना लिची कशी खातात?, असा प्रश्न विचारला, पण त्याचं उत्तर त्यांना देता आले नाही. कारण हा प्रश्न कुणा अभिनेत्यानं त्यांना विचारला नव्हता आणि तो प्रश्न पूर्वनियोजितही नव्हता.
या टीकेला उत्तर देताना परेश रावल म्हणाले, पण चरा तर कुठेही आणि कसापण खाता येतो. याला प्रतिउत्तर देताना राबडी देवी म्हणाल्या, तुम्ही रियल लाईफ मध्ये जोकर आहात. चारा कसाही खाता येतो, हे खरे असले तरी तुमच्या गुजराती काकाने लोखंडाचं राफेल विमान कसे, केव्हा, आणि कुठे खाल्ले हे कुणालाही कळाले नाही. ते अजब गुजराती काका आहेत.
5 साल एक्टिंग बहुत हो गयी अब मुद्दे की बतियाई। तुम रील ही नहीं रीयल लाइफ़ में भी जोकर हो। चारा तो कहीं भी, कैसे भी..यानि खड़े होकर, बैठकर या चलते-फिरते भी खाया जा सकता लेकिन तुम्हारे गुजराती चाचा राफ़ेल को कब, कैसे, कहाँ और क्यों चबा गए? लोहा वो भी बम समेत चबा गए। गज़ब गुजराती है https://t.co/OfkkvVTYhP
— Rabri Devi (@RabriDeviRJD) May 2, 2019