अणे- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यावर आलेली दिसून येत आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, बोरी बुद्रुक, साळवाडी, शिरोली सुलतानपूर, भोरवाडी, वडगाव कांदळी, जाधववाडी या गावांमध्ये आठ दिवसांपासून पावसाने उघड दिल्याने शेतकरी वर्ग या हंगामातील गहु, हरभरा या पिकांची पेरणी करण्यासाठी व्यस्त असताणा दिसुन येत आहे. विशेष करुन जवळपास या परिसरातील बहुतेक शेतकरी हा पारंपरिक पद्धतीने म्हणजे बैलांनी शेतीची मशागत तसेच पेरणी करीत आहे.