रंगीत प्रकाशझोतात झगमगणार वस्तुसंग्रहालयाची इमारत

संग्रहालयाचे 70 व्या वर्षांत पदार्पण ः हजारो दुर्मीळ वस्तू, ग्रंथांचा संग्रह

रेव्ह. टिळकांच्या साहित्याचे प्रदर्शन

सत्तरीत पदार्पण करीत असलेल्या वस्तू संग्रहालयाच्यावर्धापना निमित्त आज़ दि.1रोजी मोडी लिप्यंतराच्या ,लेखनाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.हे वर्ष रेव्हंरड टिळकांच्या जन्म शताब्दीचे असल्याने आगामी महिनाभर त्यांच्या वस्तूंचे ,साहित्याचे प्रदर्शन भरविले जाणार असल्याचे वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव यांनी सांगितले.

नगर – हजारो दुर्मीळ ग्रंथ, वस्तूंचा संग्रह असलेल्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाला आज (1 मे )69 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या मात्र काहीशी विस्मृतीत गेलेले हे वस्तू संग्रहालय लवकरच कात टाकून नव्या स्वरूपात नगरकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. या निमित्ताने नगरकरांच्या स्मृती पटलावर येण्यासाठी वस्तू संग्रहालयाची इमारत येत्या दोन दिवसांसाठी का होईना आपले रूप पालटणार आहे. दि.30 रोजीच्या रात्री या इमारतीला विद्युुत रोषणाई करण्यात येणार असून ती पुढे दोन दिवस नगरकरांना पाहता येईल.

एलईडी लेझर लाईटसच्या माध्यमातून बदलत्या रंगांचे प्रकाशझोत वस्तू संग्रहालयाच्या इमारतीवर टाकण्यात येणार आहेत.ही विद्युत रोषणाई अमित शेटे हे करणार आहेत. 1 मे 1960 साली सरदार मिरीकर आणि मुन्शी उम्मीद यांच्या कल्पनेतून इतिहास वाङ्‌मय मंडळाच्या माध्यमातून संग्रहालयाची संकल्पनेतून सध्याच्या मनपा सुविधा केंद्र असलेल्या ठिकाणी दोन खोल्यात संग्रहालयाची सुरुवात झाली. पुढे 1970-75च्या दरम्यान सध्याची इमारत असलेली प्रशस्त जागा मिळाली. 1975 मध्ये तत्कालिन अभिरक्षक सुरेश जोशी यांनी विशेष रस घेत बऱ्याच दुर्मीळ वस्तू, साहित्य संग्रहालयात जमा केल्या सदाशिव अमरापूरकरांच्या माध्यमातून स्टारनाईट सारखे कार्यक्रम करून भरीव निधी उपलब्ध केला.

सुरेश जोशी यांच्या नंतर 2012 साली डॉ.साताळकरांनी संग्रहालयाच्या कार्यकारी विश्‍वस्त पदाची धुरा सांभाळल्या नंतर शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अडीच ते 3 कोटी रुपयांचा निधी मिळविला. सध्या या निधीतून बांधकाम, इंटेरिअरचे काम, पार्किंग, गार्डन सुशोभिकरण आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. लवकरच हे वस्तू संगहालय नगरकरांसाठी खुले होणार आहे. वस्तुसंग्रहालयात असलेल्या जवळपास वीस हजार ग्रंथांचे डिजीटायझेशनचे काम नरेंद्र फिरोदिया यांच्या पुढाकारातून सुरू असून आतापर्यंत 5 ते 6 हजार पुस्तकांचे स्कॅनिंग पूर्ण झालेआहे. शिवाय जामखेडच्या पोपटराव हळपावत यांनी देखील त्यांचा दुर्मीळ संग्रह या वस्तू संग्रहालयाला सुुपूर्द केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.