मुंबई- भारतातीलच नाही तर जगातील नामवंत उद्योजक आणि टाटा समुहाचे सर्वेसर्वा, अध्यक्ष रतन टाटा यांच्या आयुष्यावर चित्रपट बनणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता ‘आर. माधवन’ रतन टाटा यांची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर फिरणारी ही बातमी कितपत खरी असेल, हे सांगणे फार कठीण आहे.
सध्या सोशल मीडियाच्या दुनियेत अनेक ट्विट आणि व्हिडिओ, फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. आणि सामान्य लोक सुद्धा अश्या अफवा खऱ्या आहेत हे समजून पुढे जातात.
Hey unfortunately it’s not true. It was just a wish at some fans will made the poster. No such project is even on the pipeline or being discussed. https://t.co/z6dZfvOQmO
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) December 11, 2020
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ट्विट बद्दल आता स्वत: माधवन यांनी सत्य काय आहे, हे सांगितलं. माधवन ट्विट करत म्हणाला आहे की, ‘दुर्दैवाने हे खरे नाही. माझ्या काही चाहत्यांची ही इच्छा आहे आणि म्हणून त्यांनी हे पोस्टर बनवले. असा कोणताही प्रोजेक्ट नाही आहे किंवा त्यासंबंधी कोणतीही चर्चा नाही.’, असं तो म्हणाला आहे.