आर. के. सचेती यांचे करोनाने निधन

नवी दिल्ली – जागतिक स्तरावरील बॉक्‍सिंगमध्ये भारताला यश मिळवून देणारे आणि देशात या खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे कुशल प्रशासक आणि भारतीय बॉक्‍सिंग महासंघाचे कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांचे करोनाने निधन झाले. त्यांचे वय 56 वर्षे होते. त्यांच्या निधानामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे.

प्रदीर्घ काळ प्रशासक म्हणून काम करणारे आर. के. सचेती यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांनी आज अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

भारतीय बॉक्‍सिंग क्षेत्राला नवीन उंची गाठून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. जगातील अव्वल बॉक्‍सिंग देशांच्या लीगमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

भारतातील ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी योगदान दिले होते. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून सचेती यांना ऑलिम्पिक पात्रता नियम तयार करण्याबाबत आमंत्रित केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.