कराड – मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणारी प. महाराष्ट्रातील एकमेव नामवंत ऍकॅडमी असणाऱ्या आर. के. मरिन करिअर ऍकॅडमीमध्ये मर्चंट नेव्ही अभ्यासक्रम जुलै 2023 कोर्सबाबत प्रवेश प्रक्रिया सुरू असून दिनांक 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत 10 ते 3 या वेळेत मोफत एसीडी प्रेझेंटेशन व करिअर मार्गदर्शन आयोजित केले असल्याची माहिती संचालक राहुलकुमार खडके यांनी दिली.
मर्चंट नेव्हीमध्ये सर्वोच्च वेतन, उच्च राहणीमान मोफत जगप्रवास, भरपूर रजा या वैशिष्ट्यांमुळे शिपिंग करिअर हे युवकांसाठी सोनेरी स्वप्न असते. अशा युवकांना सहजसुलभ प्रवेश मिळावा या हेतुने प्रतिवर्षी आर. के. मरिन करिअर मार्गदर्शन करीत असते. याचाच लाभ आजपर्यंत घेवून 1500 हून अधिकजण परदेशी शिपींग कंपनीमध्ये यशस्वीरित्या नोकरी करीत आहेत. यासाठी बी. टेक मरिन इंजि / बीएससी नॉटीकल सायन्स/ डिप्लोमा नॉटीकल सायन्स जी. जी. पी. रेटींग, व ग्रॅज्युएट मरिन इजिनिअरिग जी. एम. ई. बीई मेक./इलेक्ट वय 18 ते 26 हे कोर्स डी. जी. ऍप्रुव्हड गर्व्ह ऑफ इंडिया मान्यताप्राप्त अभ्यासक्रम असून यासाठी किमान 12 वी सायन्स 60 %, वय 17.5 ते 25 डिप्लोमा मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल ऑटोमोबाईल ही पात्रता असून प्रवेश अर्ज कॅडमीमध्ये उपलब्ध आहेत. सदरचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बोर्ड ऑफ सीफेअरर भारत सरकार यांच्यातर्फे प्रमाणपत्र व इंडियन सीडीसी प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या आधारे कॅडेटसना जगातील कोणत्याही शिपींग कंपनीमध्ये काम करता येते.
यासाठी 1 लाख ते 3 लाख इतके वेतन मिळते. त्यामुळे संपूर्ण जगभरात मर्चंट नेव्ही कॅडेटना भरपूर संधी उपलब्ध आहेत. जगामध्ये 70 टक्के पाणी व 30 टक्के जमिन असे भौगोलिक प्रमाण असल्यामुळे संपूर्ण जगभरात करोडो टन मालाची वाहतूक ही जलमार्गाने होत असते त्यामुळे आजही दळणवळणाच्या वाहतुकीमध्ये मर्चंट नेव्हीची जलमार्गाने होणारी वाहतूक आजही सर्वात स्वस्त असून त्याला दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे मर्चंट नेव्ही मध्ये काम करणारे इंजिनिअर्स, ऑपरेटर्स, तंत्रज्ञ तसेच कुक यांना कालही मोठ्या प्रमाणात शिपिंग कंपनीमध्ये मागणी आजही आहे व भविष्यातही तितकीच राहणार आहे. अधिक माहितीसाठी राजनक्षत्र, कार्वे नका अष्टविनायक मंगल कार्यालया शेजारी कराड येथे संपर्क साधावा, असे आवाहन संचालक राहुलकुमार खडके यांनी केले आहे.