‘क्विक रिस्पॉन्स टीम पॅटर्न सर्वत्र राबविण्यासारखा’

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून “टीम’चे लोकार्पण


 वाढदिवसानिमित्त कार्यअहवाल प्रकाशन

औंध – बाणेर-बालेवाडी परिसात अडचणीत असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी “अमोल बालवडकर क्विक रिस्पॉन्स टीम’ची स्थापना करण्यात आली असून याचे लोकार्पण नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वाढदिनी पुणे शहर भाजप संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. अमोल बालवडकर यांनी नागरिकांसाठी राबविलेला “क्विक रिस्पॉन्स टीम’हा पॅटर्न अन्य नगरसेवकांनीही राबवावा असा असल्याचे सांगून मान्यवरांकडून या उपक्रमाचे कौतूक करण्यात आले.

भाजप कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनित जोशी म्हणाले की, भाजप पक्षाचे संघटन बाणेर-बालेवाडी प्रभागात मजबूत करण्यात अमोल बालवडकर यांचे मोलाचे योगदान आहे. यावेळी प्रभागात 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी केलेल्या सर्व कामांचा लेखाजोखा चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडला आला.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक किरण दगडे, नगरसेवक दिलिप वेडे पाटील, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रकाश बालवडकर, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका सुनिता वाडेकर, भाजपा यु.मो.अध्यक्ष राघवेंद्र मानकर, पिं.चि.मनपा मा.महापौर नितिन काळजे, म्हाळुंगेचे सरपंच मयुर भांडे, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर, भाजप पुणे शहर सरचिटणीस सुनिल माने, राहुल कोकाटे, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, बाळा टेमकर, नगरसेवक संदिप कस्पटे, युवा नेते लहु बालवडकर, प्रकाश किसन बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, कोथरुड यु.मो.उपाध्यक्ष कृष्णा बालवडकर, प्रभाग अध्यक्षा उमा गाडगीळ, शिवम बालवडकर, बबनराव चाकणकर, लक्ष्मणराव सायकर, मनपा सहा-आयुक्त जयदिप पवार, बालेवाडी विठ्ठल-रुक्‍मिणी ट्रस्ट व औंदुंबर ग्रुपचे सर्व सभासद, बालेवाडी अष्टविनायक मित्र मंडळ, श्री शिवराज मित्र मंडळ, लक्ष्मीमाता मित्र मंडळचे सर्व सभासद, वसुंधरा अभियान बाणेर, बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशन व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.