रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणुकीसाठी रांग

कंपनीकडून अनेकांना थांबण्याचा सल्ला 

मुंबई – भारतातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील रिलायन्स रिटेलमधील भागभांडवल देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना काही प्रमाणात उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. यासाठी गुंतवणूकदार इतके उत्सुक आहेत की अनेक गुंतवणूकदारांना या कंपनीने थोडा वेळ थांबण्याचा सल्ला दिला असल्याचे बोलले जाते.

रिलायन्स इंडस्ट्रीजमधील जिओ प्लॅटफॉर्ममधील तब्बल 20 अब्ज डॉलरचे (1अब्ज डॉलर म्हणजे साधारणपणे साडेसात हजार कोटी रुपये) भागभांडवल देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी गेल्या एक महिन्यात घेतले आहे. त्यामुळे या कंपनीचा बोलबाला जागतिक पातळीवर वाढला आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजवरील सर्व कर्ज संपुष्टात आलेले आहे. रिलायन्स रिटेलमधील 1 अब्ज डॉलरचे भागभांडवल सिल्व्हर लेक पार्टनर्स या कंपनीने घेतले आहे. त्याचबरोबर सॉफ्ट बॅंक, कार्लाईल अशा जगातील विख्यात गुंतवणूकदारांना रिलायन्स रिटेलमधील भागभांडवल आहे.

मात्र, बऱ्याच गुंतवणूकदारांनी भांडवल खरेदी करण्याची इच्छा व्यक्‍त केल्यामुळे रिलायन्स कंपनी आता कोणत्या गुंतवणूकदारांचे भांडवल स्वीकारायचे याबाबत विचार करीत आहे. यावर्षी लॉकडाऊनच्या काळात रिलायन्स कंपनीने बरेच भांडवल जमा केल्यामुळे या कंपनीचे बाजारमूल्य 15 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.