नवी दिल्ली – इंग्लडविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील चौथा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ८ धावांनी इंग्लडवर मात केली. भारतीय संघाने सुर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकाच्या आणि शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला. या सामन्यात सुर्यकुमार यादवला वादग्रस्त पद्धतीने बाद देण्यात आले. त्यामुळे आता पंचानी दिलेल्या या वादग्रस्त निर्णयावर अनेक माजी खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यामातून टीका केली आहे.
सॅम करनच्या गोलंदाजीवर फायन लेग सीमा रेषेवर डेविड मलानने झेल घेतला. परंतु हा झेल घेताना चेंडूचा स्पर्श जमिनीला झाला होता. त्यामुळे मैदानावरील पंचानी सॉफ्ट सिग्नल बाद देऊन हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी स्पष्ट दिसत नसल्याने सुर्यकुमार यादवला बाद देण्यात आले. म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून पंचांच्या निर्णयावर टीका करताना सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कारण सीमा रेषेवर घेतलेला झेल इतक्या दुरुन मैदानी पंचाना दिसत नाही. त्यामुळे मैदानी पंच सॉफ्ट सिग्नल बाद कसा काय देऊ शकतात. असाच एक निर्णय वाशिंग्टन सुंदरच्या बाबतीत देण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर मैदानावरील पंचानी सॉफ्ट सिग्नल बाद दिला असेल तर तिसरे पंच रिप्लेमध्ये स्पष्ट न दिसल्याने मैदानी पंचाच निर्णय मान्य करतात.
माजी खेळाडूंनी ट्विटर वरुन केली टीका :
Unlucky Suryakumar Yadav poor decision by umpire onfield and 3rd umpire Hard luck SKY
— Danish Kaneria (@DanishKaneria61) March 18, 2021
दानिश कनेरियाने सुर्यकुमार यादवला बाद दिल्याने, हे दुर्दैवी असल्याचे म्हंटले आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय चूकीचे आहे असे सांगितले आहे.
Surely, there should be an option for ‘not sure’ as a soft signal #INDvsENG
— Sambit Bal (@sambitbal) March 18, 2021
आकाश चोप्रा म्हाणाला की, तो नाबाद होता. तंत्रज्ञाने हा निर्णय बदलून द्याला हवा होता.
Soft signal. Can we get rid of this ? It makes no sense whatsoever. @surya_14kumar will be gutted #DoddaMathu #INDvENG
— ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ | Dodda Ganesh (@doddaganesha) March 18, 2021
आपण सॉफ्ट सिग्नलपासून मुक्त होऊ शकतो? याचा कोणत्याही प्रकारे अर्थ नाही.
Always a good idea to give 3rd umpire real time replay of low catches along with the slow motions and zoomed-in replays. Just another perspective on the tricky low catches. #INDvENGt20
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 18, 2021
तिसर्या पंचाला रिअल टाइममध्ये पुन्हा पाहण्याची संधी देणे आणि हळू हळू झूम करणे ही चांगली कल्पना आहे, हे झेल झेलताना आणखी एक दृष्टीकोन होता.