विंझर, – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तोरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना बाबुरावजी पासलकर प्रतिष्ठानच्या वतीने २१ अपेक्षित संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबुराव पासलकर प्रतिष्ठानचे सचिव संजय पासलकर यांनी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित प्रश्नसंच याचे वाटप केले. यावेळी वेल्हे गावच्या सरपंच सीता नंदकुमार खुळे, विद्यालयाचे प्राचार्य अमर बनसोडे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी मधुरा धारकर, शर्वरी आठवले, नंदिनी वरस्कर, मीनल कुलकर्णी यांनी २१ अपेक्षित प्रश्नसंच यासाठी अर्थसहाय्य केले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रेवननाथ वाघमोडे, प्रा. एनपुरे, ज्येष्ठ शिक्षक रामदास साळुंखे, निलेश कुतवळ, प्रा. रवींद्र पुणेकर, राजीव चांदगुडे सर यांनी केले.
याप्रसंगी संजय पासलकर यांनी शिवरायांच्या कार्याची माहिती दिली.शिवरायांनी अंधश्रद्धा धर्मभोळेपणा कधीही जोपासला नाही. वास्तववादी जीवनाचा मंत्र छत्रपती शिवरायांनी दिला ज्यांनी शिवराया अभ्यासला त्यांना धर्म भोळेपणा अंधश्रद्धा जातीयता मुळीच मान्य नाही, अशा मातीमध्ये आपला जन्म झाला आहे. ज्याच्या कणाकणातून आदर्श संस्कार स्वातंत्र्य समता बंधुता समता न्याय नीती या मूल्यांची जोपासना होते, हीच तत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रुपाने आपल्याला दिली.
अतिशय ओघवत्या सरळ सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना वास्तवतेची अनुभूती अनेक उदाहरणांच्या माध्यमातून करून दिली. सूत्रसंचालन रेवननाथ वाघमोडे यांनी केले. तर, आभार प्रदर्शन राजीव चांदगुडे यांनी मांनले.