विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

शहरात 2133 स्कूल बस, व्हॅन ः केवळ 900 वाहनांची तपासणी

वाहनांचा रंग पिवळा
बसच्या दोन्ही बाजूला बर्हिवक्र भिंगाचे आरसे
दप्तरे ठेवण्यासाठी बसच्या दोन्ही बाजूला रॅक
बसच्या खिडकीखाली शाळेचे नाव
वाहनांचा वेग प्रतितास 40 कि.मी ठेवणे बंधनकारक
धोक्‍याचे इशारे देणारी प्रकाशयोजना
आरटीओच्या नियमाप्रमाणे क्षमते एवढ्याच विद्यार्थ्यांची वाहतूक

पिंपरी – शहरातील बहुतांशी शाळा सुरु झालेल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून परिवहन कार्यालयाकडून शालेय स्कूल बस व व्हॅनची तपासणी करुन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे आवाहन शाळा सुरु होण्याआगोदर करण्यात आले होते. त्यानुसार, शहरात 2133 स्कूल बस व व्हॅन असून त्यापैकी सुमारे 900 वाहनांची तपासणी झाली आहे. यामधील, अद्यापही 1233 वाहने सुरक्षेविना सुसाट धावत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा समोर येण्याची शक्‍यता आहे.

उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस व व्हॅनची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करणे अनिवार्य आहे. शहरातील विभाग निहाय शाळांच्या बसेसची तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आली आहे. शहरात 527 खासगी शाळा व 105 महापालिकेच्या शाळा आहेत. शहरातील शाळांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांचीही संख्या मोठी आहे. मात्र, शहरातील स्कूल बस व व्हॅनचालक नियमांचे उल्लंघन करत प्रमाणापेक्षा जास्त मुलांची वाहतूक करताना दिसून येतात. अनेक वाहनांमध्ये सुरक्षा उपाययोजनांचा अभाव दिसून येतो. विद्यार्थ्यांना धोकादायक पध्दतीने प्रवास सुरु असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.