मुंबई – “डॅडी” या नावाने कुख्यात गॅंगस्टार अरुण गवळीची कन्या योगिता गवळीसोबत मराठी अभिनेता अक्षय वाघमारे आज विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी योगिता आणि अक्षयचा साखरपुडा झाला होता. जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत अक्षय-हा साखरपुडा पार पडला.
दरम्यान, काल त्यांचा मेहंदी व हळदी समारंभ पार पडला. या सोहळ्याचे फोटो अक्षयने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अक्षय लग्नासाठी पुण्यातून पोलिसांची परवानगी घेऊन मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे त्याने हाताला मेहंदी लावल्याचा फोटो शेअर करत पुणे व मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
मेहंदी 🙌 #weddingvibes #thank #you #punepolice #mumbaipolice #quartinewedding
या लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग सर्व नियम पाळले जाणार आहेत. अक्षय आणि योगिता यांचे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. खरेतर हे लग्न 29 मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावे लागले होते.