fbpx

कुत्र्यावरून भांडण; चार महिलांवर गुन्हा दाखल

पिंपरी – कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होत असल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे सोमवारी (दि. 6) सायंकाळी घडली.

शमा शेठी (वय 40), भोज अंटी (वय 30), सोहमची आई (वय 35) आणि प्राजक्‍ताची आई (वय 30, सर्व रा. सुखवानी इलाईट, मोरवाडी, पिंपरी) अशा नावांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्कान राजेशकुमार डोग्रा (वय 17) यांनी मंगळवारी (दि. 6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी मुस्कान यांनी पाळलेल्या कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होत असल्याने, तिला सोडून ये, असे म्हणत आरोपी महिलांनी वाद घातला व मारण्याची धमकी दिली. निर्भया फाऊंडेशनच्या महिला कार्यकर्त्या पुनित खन्ना या समजावण्यासाठी आल्या असता आरोपी महिलांनी त्यांच्याशीही वाद घातला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.