शिरूर – गणेगाव खालसा येथे क्वारंटाइन एकाचा खासगी लॅबचा एज अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्याला पुणे (पिंपरी) येथील वायसीएम हॉस्पिटल येथे पाठवले आहे. तिथे तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले असून ते एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत.
उद्या संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल येईल, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व रांजणगाव प्राथमिक रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेराव यांनी दिली आहे.
गणेगाव खालसा येथे मुंबई घाटकोपर येथून आलेला नागरिक असून त्याला ग्रामपंचायतीच्या वतीने क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याला त्रास होऊ लागल्याने त्याने खासगी तपासणीला लॅबमध्ये आपली करोना तपासणी करून घेतली होती.