पॉझिटिव्ह रुग्णाच्या आले संपर्कात : रिक्षाचालकाची पत्नी, सासू, दोन मुळे व अन्य तीन नातेवाकांना नायडू रुग्णालयात केले दाखल
बारामती- शहरातील श्रीराम नगर येथील रिक्षाचालकाला करोना झाल्याचे रविवारी (दि. 29) स्पष्ट झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर प्रशासनानेही उपायोजनांसाठी कंबर कसली आहे. या रिक्षाचालकाच्या संपर्कात आलेल्या 83 जणांना क्वारंटाइन केले आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी, सासू, दोन मुले तसेच एका सोसायटीतील त्याचे तीन नातेवाईक यांच्यासह सात जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट सोमवारी संध्याकाळी येणार असल्याचे डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.
- दोन रुग्णालये सील; स्टाफही क्वारंटइन
बारामती शहरात आढळलेला पहिल्या करोना रुग्णाने सुरुवातीला ज्या दोन हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत. ते दोन्ही हॉस्पिटल पुढील 14 दिवस सील करण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर स्टाफ देखील क्वारंटइन करण्यात आले आहे.