रेडा -इंदापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अधिक गुणवत्ता वाढावी, घरबसल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम परीक्षा देता याव्यात. यासाठी ऑनलाइन प्रणाली वापरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून दर्जेदार तयारी केली असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
भरणेवाडी (ता. इंदापुर) येथे विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व शिक्षकांना ऑनलाईन बक्षीस वितरणप्रसंगी ते बालत होते. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, सतिश भोंग, मैनुद्दीन मोमीन, दिनेश काळे यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण 937 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यांचे क्रमांक काढून विजेत्यांना प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आले. विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात अभ्यास देण्यासाठी व तालुक्यातील इंदापूर शिक्षण विभागाचा स्वत:चा व्हिडीओ स्वरूपात अभ्यासक्रम असावा. या उद्देशाने तालुक्यातील शिक्षकांची शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दिनांक 7 ते 17 मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती, तालुक्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खपवरर्िीी श्रशरीप षीो होश हे चॅनल तयार करण्यात आला आहे. त्याचा फायदा विद्यार्थी पालकांना होत आहे. व्हिडिओ निर्मिती करताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून व्हिडिओ दर्जेदार व्हावा यासाठी झूम ऍपद्वारे ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस नंदूरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक दिलीप नरसी गावीत यांनी मार्गदर्शन केले.
या व्हिडिओ निर्मितीचा निकाल इयत्ता निहाय जाहीर करण्यात आला असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली. सुदर्शन जीन्स, लोणी देवकर या कंपनीने प्रथम क्रमांकासाठी एक हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 700 रूपये व तृतीय क्रमांकासाठी 500 रूपये अशी एकूण 14 हजार रुपये देण्यात आले.