पुणे – मार्केट यार्डात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बाजारात सुमारे 70 टक्के डाळिंब हलक्या दर्जाचे येत आहे. त्यामुळे दर्जेदार डाळिंबास चांगला भाव मिळत आहे.
घाऊक बाजारात आकार, दर्जानुसार डाळिंबाला प्रतिकिलोस 10 ते 250 रुपये भाव मिळत आहे. यापुढील काळात आवक कमी राहणार असली तरी मागणीमुळे डाळिंबाचे भाव तेजीत राहण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत.
डाळिंबाचा हंगाम जुन ते ऑक्टोबर पहिला टप्पा आणि डिसेंबर ते फेब्रुवारी-मार्च असा दुसरा टप्प्यात असतो. गुलटेकडी मार्केट यार्ड फळबाजारात सोलापूर, बारामती, पुरंदर, शिरूर, नगर, इंदापूर आदी भागांतून दररोज सुमारे 100 ते 150 टन इतकी डाळिंबाची आवक होत आहे.
डाळिंबाला मागणी चांगली आहे. घाऊक बाजारात रंग, आकार व दर्जानुसार एक किलो डाळिंबास 10 ते 250 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, अशी माहिती माहिती मार्केट यार्डातील डाळींबाचे व्यापारी अतुल जाधव आणि युवराज काची यांनी दिली.