दर्जेदार शिक्षण : अर्हम फाउंडेशनचा ध्यास

Edu Knowledge

शब्दांकन – डॉ. राजू गुरव

विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याला प्राधान्य देऊन दर्जेदार शिक्षणाचा ध्यास घेण्याचे कार्य अर्हम फाउंडेशनतर्फे सक्रियपणे सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा आराखडा तयार करून त्याची सक्षमपणे अंमलबजावणी करण्यात येऊ लागली आहे. या फाउंडेशनाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला असून ही उल्लेखनीय बाब आहे.

संस्थेच्या प्रवर्तकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील वीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर अर्हम फाउंडेशनतर्फे अर्हम कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे कॅम्प परिसरातील प्रशस्त इमारतीत गेल्या दोन वर्षांपासून हे महाविद्यालय सुरू आहे. अकरावी, बारावीचे वर्ग या ठिकाणी सुरू आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वरिष्ठ रात्र महाविद्यालयही सुरू करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षापासून इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या इंग्रजी माध्यमाची शाळाही सुरू करण्यात आली आहे. अर्हम फाउंडेशनचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, ग्रुप डायरेक्‍टर अतिष चोरडिया, सचिव श्रीकांत पगारिया सक्रियपणे कार्य करीत आहेत.

महाविद्यालयात सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची हजेरी ही बायोमेट्रिक मशीनद्वारेच घेतली जाते. कम्युनिकेशन गॅप’ राहू नये यासाठी ईआरपी बेस्ट डाटा फ्लो सिस्टिम’ राबविण्यात आली आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ऍडव्हान्स्ड अँड्रॉइड ऍपची निर्मिती करण्यात आली असून या माध्यमातून महाविद्यालयातील दररोजच्या घडामोडींची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. विज्ञान व संगणकाची आधुनिक व देखणी लॅब उभारण्यात आली आहे. नवीन स्टॅंड अलोन पद्धतीचे संगणकही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. क्‍लासरूमध्ये ऑडिओ व्हिज्युअलचा वापर करण्यावर नियमितपणे भर दिला जातो. ई-ग्रंथालयाची खास सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येते. अनुभवी शिक्षकवर्गही उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण इमारतीत सीसीटीव्ही’ बसविण्यात आले आहेत. अग्निशमन यंत्रणाही सतत सज्ज ठेवण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीने पारदर्शकपणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यावर दरवर्षी भर देण्यात येतो. वर्षभरातील अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी स्मार्ट टाईम टेबल तयार करून त्याची सक्षमपणे अंमलबजावणी करण्यात येते. विद्यार्थ्यांना व्यावसायिक व कौशल्य विकासाचे ज्ञान मिळवून देण्यासाठी वर्षभर प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येतात. विविध विषयांवर कार्यशाळा, चर्चासत्र, प्रदर्शने यांचे नियमितपणे आयोजन करण्यावर भर देण्यात येतो.

शैक्षणिक कार्याबरोबरच विविध प्रकारचे सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमही यशस्वीपणे मार्गी लावण्यात येतात. यात प्रामुख्याने दिव्यांग नॅशनल ऍवॉर्ड, काश्‍मीर फेस्टिव्हल, स्वच्छ भारत अभियान, रक्‍तदान शिबिर, जनजागृती रॅली आदींचा समावेश आहे. चाळीस गरीब व गरजू विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्यात आली आहे. अर्हमच्या संस्थापकांना पंचवीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या पुरस्कारामुळे जबाबदारीत आणखी वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच बेरोजगारीचा प्रश्‍न वाढत चालला आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासकीय पातळीवर विशेष ध्येयधोरणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुणांनी स्वत:च्या व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांमध्ये सहा महिने कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाच पाहिजे, यासाठी शासनाकडून सक्‍तीचे धोरण राबविण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना मूल्याधिष्टित शिक्षण देऊन जागरूक नागरिक घडविण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतो, असे डॉ. शैलेश पगारिया व अतिष चोरडिया यांनी स्पष्ट केले.

 

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत हे गुण विद्यार्थ्यांनी अंगी बाळगले पाहिजेत. पुस्तकी ज्ञानाबराबेरच व्यावहारिक ज्ञानही आत्मसात करण्याकडे विद्यार्थ्यांनी वाटचाल करण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे.

डॉ. शैलेश पगारिया, अध्यक्ष, अर्हम फाउंडेशन

Leave A Reply

Your email address will not be published.