Quadrant Future Tek Share Market Listing: क्वाड्रेंट फ्यूचर टेक लिमिटेडचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना याचा मोठा फायदा झाला. या आयपीओने बाजारात धमाकेदार एन्ट्री केली. आयपीओ अंतर्गत प्रति शेअर किंमत 290 रुपये होते. मात्र, बीएसईवर हा शेअर 374 रुपयांच्या किंमतीत लिस्ट झाला. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशीच 29 टक्के अथवा प्रति शेअर 84 रुपयांचा फायदा झाला.
लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी हा शेअर 444 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच, शेअर्सच्या किंमतीत आयपीओच्या तुलनेत तब्बल 53 टक्के वाढ दिसून आली. त्यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्यांना पहिल्याच दिवशी जबरदस्त परतावा मिळाल्याचे पाहायला मिळाले.
कंपनीच्या आयपीओला देखील गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. ग्रे मार्केटद्वारेही चांगल्या लिस्टिंगचे संकेत मिळाले होते. हा आयपीओ 196 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. यामध्ये 75 टक्के शेअर्स क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स साठी (QIB) आरक्षित होते. ते एकूण 139.77 पट सबस्क्राइब झाले. यातील 10 टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी होते. ते 256.46 पट सबस्क्राइब झाले. तर उर्वरित 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव होते आणि ते एकूण 268.03 पट सबस्क्राइब झाले.
क्वाड्रंट फ्यूचर टेकचे मार्केट कॅप 1,795 कोटी आहे. कंपनी भारतीय रेल्वेच्या कवच प्रोजेक्ट अंतर्गत नेक्स्ट जनरेशन ट्रेन कंट्रोल आणि सिग्नलिंग सिस्टम विकसित करते. कंपनीचा आयपीओ 7-9 जानेवारी दरम्यान गुतंवणूकदारांसाठी खुला होता. आयपीओच्या माध्यमातून 290 कोटी रुपये उभारले आहेत.