#QatarOpen : भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने पटकावले विजेतेपद

दोहा : भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा नेदरलँड्सचा जोडीदार वेस्ली कुलाॅफ यांनी कतार ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेमध्ये पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीमध्ये बोपण्णा-कुलाॅफ जोडीने ल्युक बँब्रिज- सँटिआगो गोंझालेझ या जोडीचा ३-६, ६-२, १०-६ असा पराभव करत विजय मिळविला.

यापूर्वी, उपांत्य फेरीमध्ये बोपण्णा-कुलाॅफ या तृतीय मानांकित जोडीने हेन्री काँटिनेन आणि फ्रँको स्कगोर या व्दितीय मानांकित जोडीचा ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

याआधी, बोपन्ना आणि कूलहोफ या तिस-या मानांकित जोडीन स्वित्झर्लंडच्या स्टॅन वाॅवरिंका आणि अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफो जोडीवर ६-३, ६-४ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.